Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Sangli › 'राजू शेट्टी हे उसाला लागलेले कोल्हेच'

'राजू शेट्टी हे उसाला लागलेले कोल्हेच'

Published On: Apr 15 2019 6:17PM | Last Updated: Apr 15 2019 6:25PM
इस्लामपूर : वार्ताहर 

खासदार राजू शेट्टी हे उसाला लागलेले कोल्हेच आहे. त्यांनी कितीही वाघ होण्याचा प्रयत्न केला तरी कोल्हाचा कधी वाघ होत नाही, अशी खरमरीत टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खा. शेट्टी यांच्यावर पत्रकार बैठकीत केली. हातकणंगले मतदार संघाचा निकाल धक्कादायक असेल असेही ते म्हणाले. 

सदाभाऊ खोत म्हणाले, याआधी शेट्टी हे करपलेल्या चेहर्‍यांना बरोबर घेऊन मी टोमॅटोसारखे गाल असणार्‍यांच्‍या विरोधात लढत आहे असे सांगायचे. तेच शेट्टी आता करपलेल्या चेहर्‍यांना विसरुन टोमॅटोची चव चाखायला तिकडे गेले आहेत. त्यामुळे याआधीच्या निवडणुकीप्रमाणेच ही निवडणुकही सामान्य जनता विरुद्ध नेते अशीच आहे. यामध्ये सामान्य जनतेचाच विजय होईल. शेट्टी यांना शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त खुर्ची प्यारी आहे.त्यामुळेच ते प्रत्येक निवडणूकीत वेगळी भूमिका घेत आहेत. राहुल महाडिक, वैभव शिंदे, अमोल पडळकर, वीर कुदळे, स्वरुपराव पाटील आदी यावेळी उपस्थित होते.