Tue, Apr 23, 2019 01:40होमपेज › Sangli › मिरजेत 16 एसटी चालक, वाहकांवर कारवाई

मिरजेत 16 एसटी चालक, वाहकांवर कारवाई

Published On: Jun 09 2018 2:04PM | Last Updated: Jun 09 2018 1:59PMमिरज : प्रतिनिधी 

संपाच्या पहिल्या दिवशी कामावर हजर होऊन काम अर्धवट सोडून पुन्हा संपात सहभागी झालेल्या 16 चालक व वाहकांवर निलंबनाची कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. परंतू दुपार नंतर निलंबनाची कारवाई स्थगित ठेवण्यात आली. यामध्ये 2 हंगामी चालकांचा समावेश आहे. आज संपाच्या दुसऱ्या दिवशीही एस.टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प होती.

आंतरराज्य एस. टी. वाहतूक ठप्प

महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचार्याच्या संपामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाची एकही एस. टी. न आल्याने महाराष्ट्र - कर्नाटक आंतरराज्य एस.टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प.

खासगी वाहतूक जोमात

एस. टी. वाहतूक ठप्प असल्याने मिरज - कागवाड (कर्नाटक) प्रवासासाठी मनमानी दर आकारून खासगी वाहतूक केली जात असल्याने याचा प्रवाशांना फटका बसला आहे.