Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Sangli › ‘जिल्ह्यात शंभर नंबरी’ शाळा 134 : कडेगाव ‘फर्स्ट’; सांगली ‘लास्ट’

‘जिल्ह्यात शंभर नंबरी’ शाळा 134 : कडेगाव ‘फर्स्ट’; सांगली ‘लास्ट’

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:39PMसांगली ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 92.25 टक्के आहे. 38 हजार 478 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 3 हजार 231 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावीनंतर दहावी परीक्षेतही मुलींचाच झेंडा फडकला आहे. 

मुलींचे उत्तीर्ण प्रमाण 94.34 टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 90.58 टक्के आहे. कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 95.63 टक्के निकाल आहे. सांगली शहरचा सर्वात कमी म्हणजे 90.69 टक्के निकाल  आहे. सांगली जिल्ह्यातून 41 हजार 709 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 38 हजार 478 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील 11 हजार 101 विध्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळवली. 13 हजार 589 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत 10 हजार 873, उत्तीर्ण श्रेणीत 2 हजार 915 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी 38 हजार 478 आहेत. 

दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. 18 हजार 549 मुलींपैकी 17 हजार 499 मुली उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण 94.34 टक्के आहे. 23 हजार 160  मुलांपैकी 20 हजार 979 मुले उत्तीर्ण  झाली आहेत. हे प्रमाण 90.58 टक्के आहे. 

रिपीटरचा निकाल 35.14 टक्के
जिल्ह्यातून 1 हजार 858 पुर्नपरीक्षार्थींची (रिपीटर) नोंदणी झाली होती, त्यापैकी  1 हजार 850 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 650 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 35.14 इतकी आहे. पुर्नपरीक्षार्थीमध्ये 25 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. 48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 103 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण श्रेणीत 474 विद्यार्थी आहेत. दि. 18 जूनपर्यंत गुण पडताळणी साठी अर्ज ऑनलाईन करावेत, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. 

जिल्ह्यात कडेगाव तालुक्याने दहावीच्या निकालमध्ये पुन्हा बाजी मारली आहे. कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 95.63 टक्के निकाल लागला. तर सर्वात कमी सांगली शहराचा 90.69 टक्के निकाल लागला आहे. आटपाडी तालुका 93.37 टक्के , जत 91.25 टक्के, कवठेमहांकाळ 92.35 टक्के, खानापूर 92.74 टक्के, मिरज 91.68 टक्के, पलूस 94.01 टक्के, शिराळा 95.21 टक्के, तासगाव 91.38 टक्के आणि वाळवा तालुक्याचा 92.38 टक्के निकाल लागला आहे. 

134 शाळांचा शंभर टक्के निकाल
जिल्ह्यातील 134 माध्यमिक शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. आटपाडी तालुक्यातील 12, जत 13, कडेगाव 8, कवठेमहांकाळ 7, खानापूर 12, मिरज 12, सांगली 19, पलूस, 11, शिराळा 13, तासगाव 3 व वाळवा तालुक्यातील 24 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 
 
परीक्षा दिलेले विद्यार्थी : 41709
 उत्तीर्ण : 38478, अनुत्तीर्ण : 3231
 विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण- 11101, प्रथम श्रेणी- 13589, द्वितीय श्रेणी- 10873, उत्तीर्ण श्रेणी- 2915. 
 उत्तीर्ण टक्केवारी : 92.25
 रिपीटर विद्यार्थी : 1850
 रिपीटर उत्तीर्ण : 650, अनुत्तीर्ण : 1200