Tue, Mar 26, 2019 19:54होमपेज › Sangli › आरवडे, येळावी विषबाधा; रुग्णांच्या परिस्थितीत सुधारणा

आरवडे, येळावी विषबाधा; रुग्णांच्या परिस्थितीत सुधारणा

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 9:25PMमांजर्डे : वार्ताहर

तासगाव तालुक्यातील आरवडे व येळावी येथील विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या 197 झाली आहे.  तासगाव येथे विवाहाच्या कार्यक्रमात मठ्ठा पिल्यामुळे विषबाधा झाली होती. या घटनेतील रुग्णांच्या परिस्थितीत सुधारली आहे.आरवडे येथे 83 व येळावी येथील 63 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, तर 32 बाहेर गावाचे रुग्ण आढळून आले. पैकी तासगाव ग्रामीण रुग्णालयात रविवारी 15 जणांवर उपचार करण्यात आले आहेत.

या घटनेस जबाबदार असणार्‍याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी करून सुद्धा प्रशासनाने संबंधित कार्यालय व केटरर यांच्यावर कारवाई केली नाही.आरवडे येथे विषबाधा झाल्याचे लक्षात येताच  शुक्रवारी आरोग्य यंत्रणा  कामाला लागली.  रविवारी दुपारीपयर्ंत  परिस्थितीत नियंत्रणात आली आहे. यावेळी आमदार सुमन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेडगे यांनी लक्ष घालून  योग्य उपचार करण्यास आरोग्य विभागास सुचना दिल्या.आरोग्य विभागातील, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डी. आर.पाटील, डॉ. युवराज मगदूम, प्रमोद भोसले, पराग सोनवणे व मस्के व कर्मचारी यांनी प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी डॉ. मिलिंद पोरे यांनी भेट दिली.लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमात येणार्‍यांना जेवणाची सोय करण्यापूर्वी संबंधित कार्यालय व केटरर यांची चौकशी करून व तयार केलेले अन्न व्यवस्थित आहे का, याची खात्री करून घेण्याचे आवाहन डॉ. पोरे यांनी केले आहे.

कारवाईस टाळाटाळ, उलट सुलट चर्चा सुरू

घटनेस जबाबदार असणार्‍या मंगलकार्यालय व केटररवर कारवाई करणे आवश्यक असताना तक्रार कोणी करायची?यामुळे कारवाईस टाळाटाळ सुरू आहे.आरोग्य विभाग,अन्न व भेसळ विभाग यांनी आजअखेर तक्रार दाखल केली नसल्यामुळे गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.