Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Sangli › सांगलीतील प्रश्‍न मार्गी लावूः ना. मुंडे

सांगलीतील प्रश्‍न मार्गी लावूः ना. मुंडे

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 10:30PMकडेगाव  ः वार्ताहर 

सांगली जिल्ह्यातील प्रलंबित  प्रश्‍न  तातडीने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,  असे आश्‍वासन ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी  दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी नुकतीच ना. मुंडे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. जिल्ह्यातील  प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. 

ना. मुंडे म्हणाल्या, सांगली जिल्हा परिषदेकडे खातेप्रमुख तसेच विविध संवर्गांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची कार्यवाही लवकर केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. जिल्हास्तरीय ‘स्मार्ट ग्राम शाळा’ सांगली जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर  चर्चा  करण्यात आली.  महिला व बालकल्याण सभापती डॉ.सुषमा नायकवडी, क्रीडा व आरोग्य सभापती तम्मनगोंडा रवि पाटील, कडेगाव नगरपंचायतीचे गटनेते उदय देशमुख उपस्थित होते.