Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Sangli › जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा अभियान

जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा अभियान

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:29PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरुवार दि. 11 ते 25 जानेवारीअखेर 29 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. गुरुवारी  सकाळी साडेनऊच्या सुमारास खा. संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारूण शिकलगार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अभियानादरम्यान परिसंवाद, स्पर्धा, व्याख्याने यासह विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वाघुले म्हणाले, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता माधवनगर रस्त्यावरील डेक्कन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.  जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून विद्यार्थी, वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. 

शुक्रवारी हेल्मेट, सीट बेल्ट तपासणी मोहीम होणार आहे. सायंकाळी वाहनांचे दिवे,  हॉर्न तपासणी करण्यात येणार आहे. शनिवार दि. 13 रोजी पर्यावरण प्रमाणपत्र तपासणी होईल. आटपाडीतील देशमुख महाविद्यालयात व्याख्यान होणार आहे. सांगलीतील आयटीआयमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 14 रोजी उस वाहतूक वाहनांना परावर्तक लावण्यात येणार आहेत. सोमवार दि. 15 रोजी कवठेमहांकाळ येथे चौक सभा, आष्टा, सांगलीत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

मंगळवार दि. 16 रोजी चित्रकला, निबंध स्पर्धा, बुधवार दि. 17 रोजी सांगली, पलूसमध्ये वाहनचालकांचे नेत्रतपासणी शिबिर होईल. दि. 18 रोजी हजारवाडी, विटा येथे व्याख्यान होईल. शुक्रवारी दि. 19 रोजी विटा, जत येथे व्याख्यान होईल. 20 रोजी जत, तुरची, बुधगावमध्ये व्याख्यान होईल. सायंकाळी अवैध प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात येईल. 21 रोजी उसवाहतूक करणार्‍या वाहनांना परावर्तक लावण्यात येणार आहेत. दि. 22 रोजी तासगाव, इस्लामपूर येथे प्रबोधन करण्यात येणार आहे. दि. 23 रोजी बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलरला परावर्तक लावण्यात येणार आहेत. दि. 24 रोजी सांगली, कवठेमहांकाळ येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 रोजी पोलिस मुख्यालयात सांगता समारंभ होणार आहे.