होमपेज › Sangli › सांगलीकरांच्या मदतीतून केरळ आपद्ग्रस्तांना दिलासा 

सांगलीकरांच्या मदतीतून केरळ आपद्ग्रस्तांना दिलासा 

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 27 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी 

संकट हे कुणाच्याही हातात नसते. मात्र संकटकाळी, आपत्तीवेळी मदत करणे हे आपल्या हातात असते. सांगलीकरांनी दिलेल्या मदतीतून केरळ आपद्ग्रस्तांना दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

केरळमधील आपद्ग्रस्तांना मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आज आणखी एक ट्रक मदत रेल्वेद्वारे पुणे स्टेशनमार्गे केरळला रवाना झाली. त्यापूर्वी नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम - पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर आदी   उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलिस दलातर्फे 4  लाख, 47 हजार रुपये,   निशिकांत पाटील यांच्यातर्फे   90 हजार 500 रुपयांची मदत धनादेशद्वारे  देण्यात आली. केरळ आपद्ग्रस्तांना  आज  656 किलोग्रॅम बिस्कीटपुडे, 10 किलोग्रॅम दूध पावडर, स्टेशनरी, कपडे 500 किलोग्रॅम, औषधे 410 किलोग्रॅम व 23 टन साखर पाठवण्यात आली.  आजपर्यंत 13 लाख 30 हजार 166 रुपये आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन ट्रकद्वारे  मदत दिली आहे.