Sun, Nov 18, 2018 00:46होमपेज › Sangli › नेर्लेसाठी प्रादेशिकमधून सुधारित योजना

नेर्लेसाठी प्रादेशिकमधून सुधारित योजना

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 11:03PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

नेर्ले गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी नदीपासून गावापर्यंत प्रादेशिकमधून सुधारित योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी केली. वाळवा पंचायत समितीत पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील,  जि. प. सदस्य संगीता पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, जि.प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील उपस्थित होते.

नेर्ले गावास कासेगाव प्रादेशिकमधून गेल्या 45 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र ती योजना कालबाह्य झाल्याने जलवाहिन्यांची वारंवार गळती होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न लवकरच सोडवावा, अशी मागणी माजी सरपंच संभाजी पाटील यांनी केली. 

नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी आदी गावांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आम्ही नवी योजना तयार केली आहे. या योजनेचे काम आम्ही तातडीने सुरू करू, असे आश्‍वासन कार्यकारी अभियंता बारटक्के यांनी दिले. संजय पाटील यांनी शाळा क्रमांक दोनच्या इमारतीसाठी आलेला निधी परत गेल्याची तक्रार केली. गट शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनीही जागा नावावर झाल्यानंतर हे काम सुरू करू, असे सांगितले. साखराळेचे सरपंच बाबुराव पाटील, तांदुळवाडीचे भानुदास मोटे, सुरूलचे बंडा नांगरे, कापूसखेडचे राजेश पाटील यांनी पिण्याचे पाणी व स्ट्रीट लाईट, तांडा योजनेसह विविध प्रश्‍न मांडले. ताकारीचे सरपंच अर्जुन पाटील यांनी मागण्यांचे निवेदन आ. पाटील यांना दिले.

पंचायत सदस्य पी.टी.पाटील, आनंदराव पाटील, जनार्दन पाटील, अ‍ॅड. विजय खरात, सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्‍वास पाटील, काळमवाडीचे सरपंच हंबीरराव सावंत, साखराळेचे उपसरपंच तजमुल तांबोळी उपस्थित होते.