Thu, Jun 20, 2019 21:26होमपेज › Sangli › इस्लामपुरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

इस्लामपुरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:40AMइस्लामपूर : सुनील माने

इस्लामपूर शहर दिवसेंदिवस अतिक्रमणांच्या विळख्यात अडकू लागले आहे. अतिक्रमणांमुळे प्रमुख रस्ते अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे  वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. सध्या विशेष रस्ता अनुदानातून  शहरातील 32 रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काही रस्त्यांची कामे सुरू झाली असली तरी भुयारी गटार योजना होईपर्यंत शहरातील मुख्य रस्ते होणार नसल्याने नागरिक, वाहनधारकांना वर्षभर तरी त्रास सहन करावा  लागणार आहे. 

शहराची लोकसंख्या 80 हजारांच्या घरात पोहोचली आहे. बाहेरहून येणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.  शहराचा विस्तार वाढू लागला आहे. त्याचवेळी उपनगरांमध्ये अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे.  
सध्या पालिकेला रस्ता अनुदानातून 5 कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून शहर व उपनगरातील  32 रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. यापैकी काही रस्त्यांचे काम सुरूही झाले आहे. याच दरम्यान भुयारी गटर योजनेचाही शुभारंभ झाला आहे. निनाईनगर परिसरात भुयारी गटरचे काम करून रस्त्याचे डांबरीकरण  सुरू केले आहे. 

आंबेडकरनगरपासून 100 फुटी रिंग रोड व  पेट्रोल पंप ते बहे नाक्यापर्यंत  या दोन मोठ्या रस्त्यांसाठी दीड कोटींचा वेगळा निधी प्राप्‍त झाला आहे. या रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. हा रस्ता मोठा होणार असल्याने अवजड वाहतूक बाहेरहून जाण्यास मदत होणार आहे. तसेच निनाईनगरमधील, पोलिस लाईन पाठीमागील रस्ता, गजानन महाराज कॉलनी, एकता कॉलनी या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. गेली 35 वर्षे कोळी मळ्यातील रस्ता प्रलंबित होता. या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.सध्या आलेल्या अनुदानातून उपनगरातील रस्त्यांवर भर दिला आहे. प्रामुख्याने शहरातील प्रमुख रस्ते आज  अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. शहरातून भुयारी गटार योजना करण्यात येणार 
आहे.