होमपेज › Sangli › महसूल कॉलनीमध्ये मुरूमीकरण सुरू

महसूल कॉलनीमध्ये मुरूमीकरण सुरू

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:22PMसांगली : प्रतिनिधी

शामरावनगरमधील महसूल कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासून साधा मुरूमही टाकण्यात आलेला नव्हता. परंतु दैनिक ‘पुढारी’ ने सुरू केलेल्या  ‘जनजागरण’च्या माध्यमातून  या समस्येला वाचा फोडण्यात 
आली.  त्याची तातडीने दखल घेऊन महापालिकेने मुरुमीकरण सुरू केले. तसेच निवडणुकीसाठी इच्छुकांनी देखील याकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.

महसूल कॉलनी परिसरात रस्त्यावर ड्रेनेजसाठी खोदाई करण्यात आलेली आहे. परंतु हे काम पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी चिखल निर्माण होऊन रस्त्यावरून चालताही येत नाही. त्यामुळे कॉलनीतील काहीजणांनी या रस्त्यावरील या अवस्थेचे छायाचित्र  ‘पुढारी’कडे पाठविले. ‘जनजागर’मधून याला प्रसिध्दी दिल्यानंतर महापालिका यंत्रणेची धावपळ सुरू झाली.  त्यानंतर महापालिकेच्याअधिकारी व पदाधिकार्‍यांनी तातडीने याची दखल घेऊन या भागात मुरूम टाकण्यास सुरुवात  केली.