होमपेज › Sangli › इस्लामपूर-आष्ट्यात 21 रोजी पाककृती स्पर्धा

इस्लामपूर-आष्ट्यात 21 रोजी पाककृती स्पर्धा

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 8:44PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

मकर संक्रातीचे औचित्य साधून  दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने  इस्लामपूर व आष्टा येथे हळदी- कुंकू व पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कस्तुरी क्‍लब व वारणा बझारच्या  विद्यमाने दि. 21 जानेवारीरोजी स. 10 ते 11 या वेळेत या स्पर्धां होतील.   

इस्लामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील  वारणा बझार तर आष्टा येथे चौंडेश्‍वरी मंदिराशेजारी वारणा बझारच्या शाखेमध्ये या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकाने एकच गोड व तिखट पदार्थ तयार करून आणावयाचा आहे. याच दिवशी अनुक्रमे नंबर काढून  बक्षीस दिले जाणार आहे.   यासाठी तांदळपासून बनविलेले पदार्थ 

स्पर्धेस आणणे बंधनकारक आहे.  दुपारी 3 वा. हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. वारणा बझारकडून वाण देण्यात येणार आहे. कस्तुरी सभासदांनी ओळखपत्र आणायचे आहे.  स्पर्धेत भाग घेणार्‍या महिलांनी तयार करण्यात आलेल्या पाककृतीची मांडणी  करून आणावी, साहित्य व कृतीची माहिती लिहून ठेवावी.  या स्पर्धेत अनुक्रमे 551 रुपये, 351 रुपये,  251 रुपये, उत्तेजनार्थ 101 रुपये व  भेट कूपन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कस्तुरी क्‍लबचे सभासद व वारणा बझारचे सभासद झाल्यास वर्षभर विविध सणांसाठी   30 टक्के सवलत ऑफर देण्यात येणार असल्याचे वारणा बझारचे जनरल मॅनेजर शरद महाजन यांनी सांगितले.  स्पर्धेसाठी नाव नोंदणी दि. 20 पर्यंत करावी. स्पर्धेत कस्तुरी क्‍लब तसेच वारणा बझारच्या महिला सभासदांनी सहभाग घेऊन पाककृतीचा आनंद लुटावा, असे आवाहन  कस्तुरीच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले आहे. कस्तुरी सभासद नोंदणी दै. पुढारी विभागीय कार्यालयात सुरू असून आपली नाव नोंदणी पक्की करावी. यासाठी 02342-222333,  8805023883, 8830604322 वर संपर्क साधावा.

सांगलीत ‘चला एकत्र येऊ या’

सांगली :  सांगलीत दि.  17 जानेवारीरोजी गुलाबराव मेमोरियल ट्रस्टतर्फे  रौैप्य महोत्सवी वर्षानिमित्त पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने  तरूण भारत स्टेडियम येथे सायंकाली 5.30 वाजता ‘चला एकत्र येऊ द्या’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.  दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबच्या सभासदांसाठी दैनिक पुढारी भवन सांगली येथे पासेस उपलब्ध आहेत.  तसेच नवीन सभासद होऊ इच्छिणार्‍या महिला सभासदांना व्हीआयपी पासेस उपलब्ध आहेत. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.