Tue, Apr 23, 2019 10:24होमपेज › Sangli › तळागाळापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात 

तळागाळापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात 

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:47PMजत : प्रतिनिधी 

समाजातील तळागाळातील घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. कोट्यवधी कुटुंबांना त्याचा लाभ होत आहे. पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होऊ शकतात,  असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या हभप नारायणराव सुबराव जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  जिल्हास्तरिय आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

खासदार पाटील म्हणाले, जत तालुक्यातील रस्ते,  पाणी याचबरोबर आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. भाजप सरकारने त्यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. म्हैसाळ योजनेचे काम दहा महिन्यात पूर्ण हेईल. 70 गावच्या पाणी योजनेस लवकरच मंजुरी मिळेल. आमदार जगताप म्हणाले,  जिल्हा परिषदेने माझ्या वडिलांच्या नावाने आरोग्य महाशिबिर आयोजित केले,  त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जनसेवेचे हे एक चांगले साधन आहे.  शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा सहा महिने आढावा घ्यावा. डॉक्टर अरळी यांनी सुचविल्याप्रमाणे जि. प.च्या माध्यमातून तालुक्यासाठी दोन डायलिसिस मशीन द्यावेत, अशी मागणी केली. जि. प. अध्यक्ष देशमुख म्हणाले,  आरोग्य विमा,  ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हा नियोजन मधून जिल्ह्यासाठी 6 डायलिसिस मशीन व 60 ईसीजी मशीन घेण्यात येणार आहेत. 

सभापती रवि पाटील म्हणाले,  आरोग्य विभागाने महाशिबिराचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.  प्रत्येक रुग्णांवर खात्रीने उपचार केला जाईल. यावेळी आमदार विलासराव जगताप,  जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,  आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि पाटील, समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, डॉ. रवींद्र अरळी, जि. प. सदस्य सरदार पाटील, सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, स्नेहलता जाधव,  मंगल नामद, प्रकाश जमदाडे, शिवाजी ताड, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी. जी. पवार आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील 19 खासगी रुग्णालये व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर शिबिरात सहभागी झाले आहेत.