Tue, May 21, 2019 04:13होमपेज › Sangli › ‘रत्नागिरी-नागपूर’महामार्ग गती केव्हा घेणार?

‘रत्नागिरी-नागपूर’महामार्ग गती केव्हा घेणार?

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:30PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

‘गुहागर-विजापूर’ व्हाया पलूस, तासगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर होऊन सुरू झाले आहे. ‘सोलापूर-औरंगाबाद’ या राष्ट्रीय महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र चार वर्षापूर्वी मंजूर झालेल्या ‘रत्नागिरी-नागपूर’ महामार्ग चौपदरीकरण कामाला गती येईना. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजय पाटील तसेच आमदारांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संजय निल्लावार यांनी दिली. 

‘रत्नागिरी-नागपूर’ या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण चार वर्षे रखडले आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर-तुळजापूर-लातूर-नांदेड-पुसद-यवतमाळ-नागपूर असा हा महामार्ग आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा महामार्ग अतिशय महत्वपूर्ण आहे. या मार्गावर दळणवळण मोठे आहे. वाहनांची मोठी वर्दळ आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी या महामार्गाचे चौपदरीकरण महत्वाचे आहे.

‘गुहागर-विजापूर’, ‘सोलापूर-औरंगाबाद’, ‘रत्नागिरी-नागपूर’ हे तीनही महामार्ग नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाकडे आहेत. तरीही केवळ ‘रत्नागिरी-नागपूर’ महामार्गाकडेच दुर्लक्ष का? या महामार्गाच्या चौपदरी कामांना गती कधी येणार, असा प्रश्‍न निल्लावार यांनी उपस्थित केला आहे.