Mon, Jun 24, 2019 16:55होमपेज › Sangli › कडेगावात गोविंदगिरी रथोत्सव

कडेगावात गोविंदगिरी रथोत्सव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव येथील श्री भैरवनाथ देव व श्री गोविंदगिरी महाराज यात्रेला सुरुवात झाली. श्री गोविंदगिरी महाराज रथोत्सव मिरवणूक उत्साहात झाली.सकाळी 10 वाजता रथोत्सवास सुरुवात करण्यात आली. कडेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. एस. पुजारी, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, संतोष डांगे, डी. एस. देशमुख यांच्याहस्ते श्रीफळ वाढविले. कडेगावातील थोर संत श्री गोविंदगिरी महाराज यांनी जिवंत समाधी घेतली आहे. त्यांची कडेगावच्या दक्षिणेला डोंगराईच्या पायथ्याला जिवंत समाधी आहे.  गावकर्‍यांकडून श्री गोविंदगिरी महाराज या देवालयाचा प्रतिकृतीचा रथ तयार करण्यात आला आहे.

धनंजय देशमुख, वसंतराव गायकवाड, विजय गायकवाड, विनोद गोरे, राजू जाधव, चंद्रहार देशमुख, दादा गायकवाड यांच्यासह मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते.दरम्यान, माजी मंत्री (स्व.) आ. डॉ. पतंगराव कदम आणि ज्येष्ठ नेते स्व. पांडुरंग गोविंद डांगे यांच्या निधनाने यात्रेतील सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रम व कुस्त्यांचे मैदान रद्द करण्यात आले आहेत. केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री भैरवनाथ गोविंदगिरी यात्रा मंडळाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.  

यात्रेनिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रवचन होणार आहे. 31 मार्चरोजी श्री जोतिर्लिंग भव्य पालखी सोहळा होणार आहे. रविवार दि.8 एप्रिलरोजी ग्रामदैवत श्री भैरवनाथ पालखी सोहळा होणार आहे. या दिवशी पहाटे साडेपाच वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या मूर्तीस महाभिषेक व काकड आरती सोहळा होणार आहे.

Tags : Sangli, Sangli News , Rath Mahostav, Kadegaon


  •