Fri, Nov 15, 2019 15:09होमपेज › Sangli › मिरजेत विवाहितेवर बलात्कार

मिरजेत विवाहितेवर बलात्कार

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
मिरज : प्रतिनिधी
एका महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवून  अश्‍लील चित्रीकरण करून  व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित कलिम सय्यद (वय 28, रा. गुलमोहर कॉलनी, मिरज) याच्याविरुद्ध शहर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलिम सय्यद याचे  एकाच्या घरी नेहमी जाणे येणे होते. त्यामुळे त्याच्या  22 वर्षीय पत्नीसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. कलिम हा त्या पीडित तरुणीस “तुझे सासू, सासरे आणि नवरा वाईट आहे. मी तुझ्याशी लग्न करतो, तुला चांगले सांभाळतो” असे म्हणाला. त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने पीडितीचे अश्‍लिल चित्रीकरण केले. ते  चित्रीकरण सोशल मीडियावर व्हारयल करण्याची धमकी देत कलिम याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची पीडितेची तक्रार आहे. वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळलेल्या पीडितीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे कलिम याने पीडितेचे अश्‍लिल व्हिडीओ तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठविले. शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर बदनामी करण्याची धमकी दिली. संबंध ठेवण्यासाठी दमदाटी केली. 

तसेच पीडितेला “माझ्याशिवाय कोणाशी बोलायचे नाही, नाहीतर तुला मारून टाकीन” अशी धमकी दिली. कलिम याने तिचा वारंवार पाठलाग केल्याचेही पीडितीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कलिम याच्याविरुद्ध  बलात्कार आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.