Fri, Sep 21, 2018 01:43होमपेज › Sangli › शिराळ्यात महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल 

शिराळ्यात महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:28AM

बुकमार्क करा
शिराळा  ः प्रतिनिधी 

शिराळा येथील सुगंधानगर येथील रामचंद्र आनंदा वडार (वय 42, मूळ गाव अंत्री) याने  बलात्कार व विनयभंग केल्याची तक्रार शिराळा पोलिस ठाण्यात एका विवाहित महिलेने  दिली आहे. वडार याच्याविरुद्ध शिराळा पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला आहे. 

शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : दि. 10 जानेवारीला दुपारी बारा वाजता ती महिला घरात एकटी होती. त्यावेळी  रामचंद्र वडार  याने तिचा विनयभंग केला. असाच प्रकार पुन्हा दि. 15  जानेवारी रोजी सुगंधानगर येथील भाड्याने घेतलेल्या घरामध्ये झाला अशी तक्रार आहे.

यानंतर त्याच दिवशी रात्री साडेसात वाजता  महिला  घरात एकटी असताना त्याने तिला मारण्याची धमकी दिली व बलात्कार केला असे तक्रारीत म्हटले आहे. महिलेने  बलात्काराबद्दलची   घटना पतीला सांगितली.  त्यानंतर  तिने  रात्री उशिरा शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. एन. वाईकर  करीत आहेत.