Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Sangli › युवतीवर बलात्कार; सांगोल्याच्या दोघांना अटक 

युवतीवर बलात्कार; सांगोल्याच्या दोघांना अटक 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 11:18PMआटपाडी : प्रतिनिधी 

लग्नाचे आमिष दाखवून तसेच  लग्नाचा बनाव करुन येथील एका युवतीवर बलात्कार  केल्याच्या  प्रकरणी  अमरसिंह दत्तात्रय देशमुख (वय 20) आणि दत्तात्रय नारायण देशमुख (वय 42, दोघेही रा. बिलेवस्ती,  सांगोला, जि. सोलापूर) यांना  आटपाडी पोलिसांनी अटक केली. या संशयितांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले.   अमरसिंह देशमुख याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. दत्तात्रय देशमुख याला दि.23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

महाविद्यालयात शिकणार्‍या या युवतीशी अमरसिंह देशमुख याने ओळख करून घेतली. लग्नाचे आमिष दाखवून तिला पुण्यात बोलवून त्याने एका मंदिरात लग्न केले. मित्राचा फ्लॅट स्वत:चा असल्याचे सांगून तेथे काही दिवस ते  राहिले. या कालावधीत त्यांचे शरीरसंबंध आले होते. त्यानंतर त्यांचे भांडण झाल्याने ती युवती आटपाडीत आली. आईला या घटनेची कल्पना दिली.  आईने मुलाच्या वडिलांना फोन केला असता त्यांनी दोघींना शिवीगाळ व दमदाटी केली.

या घटनेनंतर अमरसिंह व त्याचे वडील मुलीच्या घरी आले. त्यावेळी घरी अन्य कुणी नव्हते. ते तिला गाडीतून घेऊन गेले. काही अंतरावर गेल्यावर  दोघांनी मुलीला शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाण केली. पुन्हा अमरसिंहचे चुलते, चुलती, भाऊ आणि बहीण यांनीही  या युवतीला धमकावले आणि शिवीगाळ केली. या युवतीने अमरसिंह देशमुख  व अन्य सहाजणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांनी गुन्हा  दाखल केला.