Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Sangli › विट्यात धुळे घटनेच्या निषेधार्थ काढली रॅली 

विट्यात धुळे घटनेच्या निषेधार्थ काढली रॅली 

Published On: Jul 09 2018 5:51PM | Last Updated: Jul 09 2018 5:51PMविटा (जि. सांगली) : प्रतिनिधी 

धुळे येथील डवरी गोसावी समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डवरी गोसावी समाज संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समतावादी महासंघ, भारिप बहुजन महासंघ, बहुजन क्रांती मोर्च आणि बसपा यांच्यावतीने शंखध्वनी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

धुळे येथे डवरी गोसावी समाजातील लोकांचे सामूहिक हत्याकांड करण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेची मागणी आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ सर्व बहुजनवादी संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नियोजन डवरी गोसावी समाज संघटना यांनी केले. रॅलीची सुरुवात डवरी गोसावी वस्तीपासून करण्यात आली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण पुतळा, विटा पालिका ते आंबेडकर पुतळा असे करून तहसीलदार कार्यालय येथे रॅलीचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले.  

यावेळी डवरी समाजाचे नेते अर्जुन लगड, 'रिपाइं'चे बाबासाहेब कांबळे, समतावादी महासंघाचे संदीप ठोंबरे, उत्तम माळवे, सुरेश शिंदे, सुरेश आयवले, अनिल निबवडे, दत्ताभाऊ नलवडे, अमोल मदने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. तहसील कार्यालयासमोर रॅली आल्यानंतर बाबासाहेब कांबळे, संदीप ठोंबरे, एल. एम. खरात, अमोल मदने, अर्जुन लगड यांची भाषणे झाली. त्यानंतर  नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी मोठा फौज फाटा ठेवला होता. यावेळी  बाळासाहेब झेंडे, शिवाजी साबळे, दादासाहेब चंदनशिवे, स्नेहल कुमार चंदनशिवे, सुनिल लोढे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.