Thu, Nov 15, 2018 11:42होमपेज › Sangli › राजू शेट्टी, आम्हाला पाठिंबा द्या : जयंत पाटील

राजू शेट्टी, आम्हाला पाठिंबा द्या : जयंत पाटील

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 12:08AMमिरज : शहर प्रतिनिधी 

तुम्ही आता भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे, त्यामुळे आम्हाला पाठिंबा द्या, अशी साद राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांना घातली. येथील बालगंधर्व नाट्यगृहात आज सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात हे दोघेही प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. त्या दोघांमध्ये गप्पा रंगल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

येथील बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील व खासदार राजू शेट्टी हे दोघे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. हे दोघेही कट्टर विरोधक आहेत. मात्र हे दोघेही आज एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी एकमेकांच्या शेजारी बसून यांनी गप्पा मारल्या. त्यामुळे समोर बसलेल्यांच्या भुवया उंचावल्या. 

या कार्यक्रमात पहिल्यांदा जयंत पाटील यांनी भाषण केले. ते राजू शेट्टींना उद्देशून म्हणाले, तुम्ही आता भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे तर मग आता आम्हाला तरी पाठिंबा द्या, अशी साद त्यांनी घातली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी भाषण केले. ते म्हणाले, अत्यंत छोटी मुंगीही हत्तीला हलवते. तसे काम आमचे आहे. शेतकर्‍यांना फसवणार्‍या भाजपला आम्ही आता साथ देणार नाही, त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. तुम्हाला पाठिंबा द्यायचा की नाही हे शेतकर्‍यांशी चर्चा करूनच ठरवेन, असे राजू शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले.

Tags : sangli, Raju Shetty, give us support, says Jayant Patil, sangli news,