Thu, Feb 21, 2019 07:03होमपेज › Sangli › सदाभाऊ किरकोळ माणूस: राजू शेट्टी 

सदाभाऊ किरकोळ माणूस: राजू शेट्टी 

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 8:42PMइस्लामपूर: वार्ताहर

दुधात पाणी आहे की नाही हे वेळ आल्यावरच कळेल. थांबा आणि पाहा, असा असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. 

सदाभाऊ किरकोळ माणूस त्याचे नाव माझ्या जवळ कशाला काढता, असा ही सवाल त्यांनी पत्रकारांना केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे दुध दराचे आंदोलन यशस्वी झाले, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले. आता थकीत एफआरपीसाठी आंदोलन उभा करणार आहे. भाजप सरकार हे शेतकऱ्यांची विरोधातील सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशक फवारून कमल नष्ट करावे असेही ते म्हणाले. मी सर्व पक्षांपासून समान अंतरावर आहे मी फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहे.