Sun, Nov 18, 2018 23:56होमपेज › Sangli › राजेश फाळके खून खटला जलदगती न्यायालयात चालवा 

राजेश फाळके खून खटला जलदगती न्यायालयात चालवा 

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 11:09PMतासगाव : प्रतिनिधी

वायफळे येथील मातंग समाज बांधव राजेश फाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित वाळूमाफिया आहे. त्याच्या विरोधातील खटला सरकारने जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. येथे राजेश फाळके यांच्या शोकसभेत ते बोलत होते.

प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, राज्यात सर्वत्र मातंग समाज बांधवांवर हल्ले होत आहेत. हल्ले करणारे भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सरकारने फाळके यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी. त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी द्यावी. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध क्षेत्रावरील मान्यवरांनी फाळके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मातंग सेवा संघाचे प्रा. राम कांबळे, संदेश भंडारे, भीमराव भंडारे, संदीप ठोंबरे, साहेबराव पाटील, अरुण खरमाटे, शंकर माने, नानासाहेब वाघमारे,  प्रवीण धेंडे यांनी श्रध्दांजली वाहिली. 

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, प्रकाश फाळके, अमित सावंत, प्रमोद लोखंडे, अमित कांबळे, संतोष हंकारे उपस्थित होते.