Tue, Jan 22, 2019 03:29होमपेज › Sangli › राजयोगचा सेंद्रिय भाजीपाला शेती प्रकल्प आदर्शवत : एकनाथ शिंदे

राजयोगचा सेंद्रिय भाजीपाला शेती प्रकल्प आदर्शवत : एकनाथ शिंदे

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:18PMकडेगाव  : वार्ताहर  

राजयोग अ‍ॅग्रो कंपनीने सुरू केलेला सेंद्रिय भाजीपाला शेती प्रकल्प आदर्शवत असल्याचे प्रतिपादन  सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथे राजयोग कंपनीच्या सेंद्रिय भाजीपाला विक्री शॉपी उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राजयोग अ‍ॅग्रो कंपनीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, संचालक लक्ष्मण माने, राहुल सावंत प्रमुख उपस्थित होते. ना. शिंदे म्हणाले की, आज धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्यांना स्वच्छ व चांगल्या प्रतीचा भाजीपाला मिळणे अवघड होत आहे.

मुंबई सारख्या एका मोठ्या शहरात राजयोग कंपनीने सेंद्रिय भाजीपाला विक्रीचा घेतलेला निर्णय स्वागातार्ह आहे. अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले, कंपनीने सुरू केलेल्या सेंद्रिय भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चित्रपट निर्माते विजय देवकर, अमर किर्दत, परी मेहता, अर्जुन कणसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.