Thu, Apr 25, 2019 15:54होमपेज › Sangli › राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी

राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:33PMसांगली : प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती शहरासह जिह्यात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शासनाच्यावतीने आजचा दिवस सामाजिक न्यायदिन म्हणून  साजरा केला जातो. यानिमित्त समाजकल्याण विभागातर्फे काढलेल्या  चित्ररथ आणि विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शिक्षणाधिकारी महेश चोथे, समाजकल्याण विभागाचे सचिन साळे, दलितमित्र अशोक पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

रॅलीची सांगता स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ झाली. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.यावेळी रॅलीत सामाजिक समता रथाबरोबर पटवर्धन हायस्कूल, सिटी हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल माहिती देणारे विविध फलक होते.  अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.