होमपेज › Sangli › भीमा कोरेगावप्रकरणी पंतप्रधानांकडून दुजाभाव 

भीमा कोरेगावप्रकरणी पंतप्रधानांकडून दुजाभाव 

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 1:44AM

बुकमार्क करा
भिलवडी : प्रतिनिधी

पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे. फक्‍त गुजरातमधील मृत्युमुखी पडलेल्या बांधवांविषयी पंतप्रधानांकडून ट्विट केले जाते. महाराष्ट्रात जातीयवाद भडकला असताना भीमा कोरेगावप्रकरणी पंतप्रधानांकडून दुजाभाव केला जात आहे, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्‍त केले.

औदुुंबर येथे बोलताना ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरण, मुंबई रेल्वे पूल दुर्घटना यामध्ये बळी पडलेल्यांविषयी पंतप्रधानांनी काहीच भाष्य केले नाही. एका मिलच्या आगीत 14 गुजराती बांधव मृत्युमुखी पडले. त्यावर पंतप्रधानांनी ट्विट केले. पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे. पंतप्रधानपदावर असूनही आपल्या राज्याकडे, तेथील जनेतेकडे त्यांचे लक्ष आहे, हे पाहून चांगले वाटले, अशी उपहासात्मक टीका ठाकरे यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरण लोकसभेपर्यंत गाजले.  

बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस हायवेसाठी यांना गुजरात आठवतो. पैसा उपलब्ध होतो. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी वेळी हे काहीच बोलत नाहीत. येथे काँग्रेस, भाजप अथवा अन्य पक्षांचे लोक असले तरी मी घाबरत नाही. मला जे पटते, ते मी बोलतो व करतो. निवडणुकांवेळी एकमेकांच्या उरावर बसूयात. पण अन्य वेळी महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी एकत्र येऊया. राजकारणाच्या, जातीयवादाच्या भिंती पाडून महाराष्ट्रासाठी काम करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

मोदींनी फक्त गुजराती लोकांसाठी श्रद्धांजली वाहिली; राज यांची घणाघाती टीका  <... See Video