Sat, Apr 20, 2019 16:32होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे कुटुंबीयांची राज ठाकरे यांनी घेतली भेट

अनिकेतच्या कुटुंबातील एकाला 'भारती'मध्ये नोकरी!

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:58PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

पोलिस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे कुटुंबियांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. पोलिसांच्या गुंडशाहीने अनिकेतचा बळी घेतल्याची भावना बंधू आशिष व अमित कोथळे यांनी व्यक्‍त केली. यावेळी ठाकरे यांनी याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईसाठी मनसे पूर्ण ताकद मागे लावेल, असे ते म्हणाले. 

भारती विद्यापीठाचे कार्यवाह व काँग्रेसचे युवा नेते डॉ. विश्‍वजित कदम यांनी भारती विद्यापीठात कुटुंबियांतील एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन मला दिले आहे. त्यामुळे आता नोकरीचा हा प्रश्‍न संपल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, नेते नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, अनिकेतची पत्नी, आई, वडील व चिमुकली कन्या आदींसह  जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहराध्यक्ष अमर पडळकर आदी उपस्थित होते.