Thu, Apr 25, 2019 04:12होमपेज › Sangli › यशवंतराव चव्हाणांवर टीका, मग आता का नाही?; राज ठाकरे (video)

यशवंतराव चव्हाणांवर टीका, मग आता का नाही?; राज ठाकरे (video)

Published On: Jan 14 2018 8:03PM | Last Updated: Jan 15 2018 9:37AM

बुकमार्क करा
सांगली: पुढारी ऑनलाईन (सर्व व्हिडिओ- विजय लाळे)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औदुंबर येथे झालेल्या सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. पाहा राज काय म्हणाले...  

1) मुंबईतील रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किंवा कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली नाही तर कमला मिल येथे लागलेल्या हॉटेलमधील गुजराती लोक गेले तर त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली. 

2) सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर, सामाजिक परिस्थितीवर आजचे कवी, साहित्यिक गप्प का आहेत असा सवाल राज ठाकरे यांनी केला. देशात आणिबाणी लागू झाल्यानंतर कराडला मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर दुर्गा भागवत यांनी सरकारवर सडकून टीका केली होती. मग आता तुम्ही गप्प का?. मी राज्यातील साहित्यिक, कवींना आव्हान करतो की महाराष्ट्रात जे काही घडतय त्यावर लिहा, बोला... 

3) विविध राजकीय पक्षांच्या, जातींच्या, धर्मांच्या भिंती पाडा आणि महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी एक व्हा- राज ठाकरे 

4) महिलांनीही जे जे शक्य आहे ते लिहावे, कविता करा, वाचकांची पत्रे पाठवा. मराठी भाषा वाचण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते करा नुसते इतरांवर सोपवून चालणार नाही- राज ठाकरे 

5) चांगल्या समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांच्या हातात आहे. आज जर गप्प बसला सर्वांना पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागेल- राज ठाकरे