Wed, May 22, 2019 06:29होमपेज › Sangli › डॉ. कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

डॉ. कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 9:56PMकडेगाव : शहर प्रतिनिधी  

माजी मंत्री (स्व.)डॉ.पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात बसस्थानक चौकालगत उभारण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या मासिक  सभेत हा ठराव एकमताने  मंजूर करण्यात आला. यासाठी नगरपंचायतीच्या अंदाजपत्रकात  25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आकांक्षा जाधव होत्या.

नगरपंचायतीच्या सभागृहाचे ‘ (स्व.)डॉ.पतंगराव कदम स्मृती सभागृह’ असे नामकरण करावे आणि तिथे त्यांचे पूर्णाकृती तैलचित्र  ठेवावे असा ठरावही मंजूर झाला.याशिवाय  शहराच्या वेशीवर कराड ,विटा आणि तडसर रस्त्यावर त्यांच्या नावाचे  प्रवेशद्वार उभारण्याचा ठरावही मंजूर झाला. अग्निशमन वाहन खरेदी व  घरोघरी  नळांना मीटर बसविणे असे  ठरावहीसभेत मंजूर झाले.  ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.

नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या, कडेगाव हे डॉ. पतंगराव कदम यांचे आवडते शहर.  या तालुक्याची निर्मिती ,नगरपंचायतीची मंजुरी आणि या शहराचा विकास यात त्यांचे बहुमोल योगदान आहे. त्यामुळे कडेगावकरांनीच आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.उपनगराध्यक्ष साजिद पाटील, नगरसेवक सागर सूर्यवंशी ,राजू जाधव, दिनकर जाधव, सुनील पवार ,रिझवाना मुल्ला ,संगीता जाधव ,नीता देसाई, श्रीरंग माळी आदि नगरसेवक तसेच मुख्याधिकारी चरण कोल्हे उपस्थित होते.