Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे ‘वर्षासहल’

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे ‘वर्षासहल’

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:25PMइस्लामपूर : प्रतिनिधी

पावसाळ्याची सुरुवात झाली की  निसर्गाची मुक्त उधळण, कडेकपारीमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना साद घालत असतात. दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यातील ‘राऊतवाडी’  धबधबा येथे दि. 29 जुलैरोजी वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 200 फुटांवरून वाहणारा राऊतवाडीचा हा धबधबा हे या सहलीचे खास आकर्षण आहे. 

कस्तुरी क्‍लबतर्फे या एकदिवसीय वर्षा सहलीचे आयोजन 29 जुलैला करण्यात आले आहे. या सहलीसाठी कस्तुरी क्‍लब सभासदांना प्रत्येकी फक्त 500 रुपये व जे सभासद नाहीत त्यांना 700 रुपये शुल्क भरावयाचे आहेत. सहलीचा प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा-बिस्कीट हे सर्व कस्तुरी क्‍लबमार्फत देण्यात येणार आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात राऊतवाडीचा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सभासदांनी कस्तुरी क्‍लब आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे, असे  आवाहन कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले आहे.