Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:21AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा, तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावण होते. मान्सून सुरू होऊन 20 दिवसांचा कालावधी लोटला आहे. हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त केला होता; पण जूनच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. 

मंगळवारपासून जिल्ह्यात हळूहळू मान्सूनचे वातावरण दिसू लागले आहे. बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. सांगली, मिरज शहरांत अधूनमधून हलक्या सरींची बरसात झाली. शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिवारांत व रस्त्यांवर पाणी साचले. याचा फायदा धूळवाफ भातपेरणीला होणार आहे. वाळवा तालुक्यातील काही गावांत मध्यम पाऊस पडला. पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडीसह अनेक ठिकाणी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा भिज पाऊस पडला. कडेगाव, तासगाव, मिरज तालुक्यांत हलक्या सरी आल्या.