Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Sangli › रेल्वेत चोर्‍या करणारा गजाआड

रेल्वेत चोर्‍या करणारा गजाआड

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:30PMमिरज : प्रतिनिधी

अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेसमधून इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील रेखा ललित भंडारे यांची 5 लाख 14 हजार 200 रुपये किमती ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने पुणे स्थानकादरम्यान लंपास केली आहे. गुन्हा घडल्यानंतर तत्काळ पुणे रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म नं. 2 वर आरपीएफने अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय 19, रा. गुलबर्गा, कर्नाटक) या संशयितास अटक करून चौकशी केली असता रेखा भंडारे यांच्या पर्स चोरीसह अन्य 3 चोर्‍याही उघडकीस आल्या आहेत. सुमारे 20 लाखांच्या आसपास किमती ऐवज, सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्‍कम जप्‍त करण्यात आली,  असल्याची माहिती आरपीएफ कडून देण्यात आली आहे.

इस्माईल हा आरक्षीत बोगी तसेच वातानुकुलीत बोगीत तिकीट आरक्षीत करुन प्रवास करायचा. रात्रीच्यावेळी प्रवासी झोपी गेल्यानंतर हा चोर्‍या करायचा. व नजीकच्या मोठ्या स्थानकात उतरुन पसार व्हायचा. त्यामुळे इस्माईल याचा कोणास संशय यायचा नाही.

इचलकरंजी येथील रेखा भंडारे या अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेसने वातानुकुलीत बोगी ए-1 बोगीतून  प्रवास करीत होत्या. पुणे स्थानका दरम्यान त्यांची 5 लाख 14 हजार 200 रुपये किंमती ऐवज असलेली पर्स लंपास झाली होती. सदर चोरी संदर्भात रेखा भंडारे यांनी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर चोरीचा प्रकार पुणे स्थानका दरम्यान झाला, असल्यामुळे सदर गुन्ह्याची माहिती तात्काळ पुणे रेल्वे पोलिस व आरपीएफ यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारे पुण्यात आरपीएफकडून प्लॅटफार्म क्र. 2 वर इस्माईल यास संशयावरुन ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने रेखा भंडारे यांची चोरलेली पर्स मिळून आली. तसेच त्याने अन्य तीन चोर्‍या केल्याचीही कबूली दिली आहे.

इस्माईल यास अटक करुन  चोरीची घटना उघडीस आणण्याची कारवाई पुणे आरपीएफ उपअधीक्षक मकारीया यांच्या मार्गदर्शनाखालील चाटे, कांबळे, व्ही.पी.सिंग, एच.आर.खोकर, एस.डी.बडे, विशाल माने, युवराज गायकवाड यांच्या पथकाने केली आहे. 

तसेच 7 जुलै रोजी अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेसध्ये ए-2 वातानुकुलीतून एका प्रवाशाचे 7 लाख 58 हजार 499 रुपये किंमती ऐवज असलेली बॅग इस्माईल याने चोरी केल्याचे उघडीस आले आहे. अल्लाबक्ष इस्माईल हा अट्टल चोरटा असून पुणे-मिरज तसेच अन्य मार्गावरील अनेक रेल्वे मार्गावरील चोर्‍या त्याच्याकडून उघडीस येण्याची शक्यता आहे.