Thu, Jun 27, 2019 10:33होमपेज › Sangli › रेल्वे स्टेशनजवळ चाकूच्या धाकाने प्राध्यापकास लुटले

रेल्वे स्टेशनजवळ चाकूच्या धाकाने प्राध्यापकास लुटले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकाजवळ प्रा. शहाजी धोंडीराम गडदे (वय 38, रा. कलानगर ) यांना चाकूचा धाक दाखवून लुटले. शिंदे मळ्यात रेल्वेस्थानकाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन अल्पवयीन अज्ञात संशयितांविरोधात मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गडदे  हातकणंगले येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. सांगली ते हातकणंगले असा प्रवास ते रेल्वेने करतात. शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर - पुणे या पॅसेंजरने  येऊन सांगली स्थानकात उतरले. त्यानंतर ते रेल्वे रुळावरून चालत जात असताना पाठीमागून तीन अज्ञात चोरटे  आले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख पाचशे रुपये, मोबाईल, एटीएम कार्ड हे सर्व काढून घेतले. 

त्यानंतर गडदे यांनी ही माहिती संयजनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडला असल्याने तो मिरज रेल्वे पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.