Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Sangli › सांगलीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा

सांगलीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:35PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील ट्रक अड्डा परिसरातील महापालिकेच्या एका गाळ्यात सुरू असलेल्या बेकायदा कॅसिनोवर शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संगणकावर जुगार चालविणार्‍या युवकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोकड, संगणक असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

उमेश मच्छिंद्र पाटील (वय 22, रा. पत्रकारनगर, सुतार प्लॉट, कोल्हापूर रस्ता, सांगली) असे अटक केलेल्या कॅसिनो चालकाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक  निकम यांना ट्रक अड्डा परिसरातील महापालिकेच्या एका गाळ्यात कॅसिनो जुगार सुरू असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास तेथे छापा टाकला. 

त्यावेळी उमेश संगणकावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यावेळी जुगार खेळण्यासाठी आलेले दोघेजण पोलिसांची चाहूल लागताच तेथून पळून गेले. उमेशला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर कॅसिनो नावाचा जुगार इंटरनेटवरून घेतल्याची कबुली त्याने दिली. हा जुगार खेळणार्‍यांकडून पैसे घेतले जातात. तसेच आकड्यांवर त्यांच्याकडून पैसे लावले जातात. त्यामध्ये जिंकणार्‍यांना एक रुपयाला नऊ रुपये उमेश देत होता. 

पोलिसांनी सांगितले, की उमेश  हा जुगार अड्डा चालवत असल्याची कबुलीही त्याने दिली आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी दोनशे रुपयांची रोकड, एक संगणक, वायफाय मशीन असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. निकम, जयवंत पवार, महेंद्र साळुंखे यांनी ही कारवाई केली. मोरे, उपसरपंच निलेश पवार, संचालक दादासो मोरे, सुजित मोरे, उमेश पवार, बाळासाहेब लाड, हणमंत पाटील, अ‍ॅड. संग्राम पाटील, अजित पाटील, महिपती पाटील, सरपंच गणेश हराळे यांच्यासह गावा-गावातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोदींना जोराचा झटका?

आमदार पाटील म्हणाले, मुंबईतील झोपडपट्टीत सभा सुरू असताना मी लोकांना प्रश्‍न केला की, मोदीसाहेबांनी तुमच्या खात्यावर 15-15 लाख वर्ग केले का? यावर एक गृहस्थ म्हणाले, थोडे थांबा. ते काहीतरी मार्ग काढतील.  15 नाही, तरी 4 ते 5 लाख दिले तरी चालेल. मात्र तसे नाही झाले तर मोदींसाहेबांना जोराचा झटका देऊ. यावर एकच हशा पिकला.