Tue, Jul 23, 2019 04:38होमपेज › Sangli › लॉटरी सेंटरवर छापे; सात जणांना अटक 

लॉटरी सेंटरवर छापे; सात जणांना अटक 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:40PMमिरज : शहर प्रतिनिधी

येथे असणार्‍या शिवशंकर राहुल लॉटरी सेंटर व प्रियदर्शिनी हॉटेलजवळील गणेश ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. पत्त्यांचा जुगार व मटका जुगार खेळणार्‍या सात जणांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निरीक्षक अजय जाधव यांनी आज, शुक्रवारी दुपारी हा छापा टाकला. राहुल लॉटरी सेंटरमध्ये सुनील राजाराम बंडगर, विनोद सोपान सातपुते, सदानंद महालिंग खेराडकर (तिघे रा. मिरज) हे तिघे सापडले. त्यांच्याजवळची 19 हजार रुपयांची रोकड, 3 मोबाईल, जुगाराचे साहित्य  जप्त करण्यात आले.

दुसरा छापा प्रियदर्शिनी हॉटेलजवळील गणेश ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये टाकला. तेथे स्वप्निल राजू बंडगर, रोहित राजेंद्र हंडीफोड, तौफिक निसार नदाफ, विशाल रमेश कोळेकर (रा. मिरज) या चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 4 हजारांची रोकड, 3 दुचाकी, 3 मोबाईल, संगणक असा 3 लाख 4 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.