Fri, Jul 19, 2019 05:35होमपेज › Sangli › मिरजेत लॉजवर छापा : वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक 

मिरजेत लॉजवर छापा : वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक 

Published On: Jan 07 2018 10:45AM | Last Updated: Jan 07 2018 10:45AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मिरजेतील न्यू पूर्वा रेसिडन्सी लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या पीडित युवतीची सुटका करण्यात आली. लॉजच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संशयित महिला एजंट मात्र पसार झाली आहे.  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस अधिकार्‍यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. 

प्रशांत लक्ष्मण ऐवळे (वय 24, रा. म्हैसाळ वेस, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगलीतील स्वाती पाटील नामक महिला एजंट पसार झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना न्यू पूर्वा रेसिडन्सी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला कारवाईचे आदेश दिले होते. 

त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा लॉजवर छापा टाकला. त्यावेळी युवतीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी व्यवस्थापक प्रशांत ऐवळेला अटक करण्यात आली. दरम्यान, फोनवरून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे युवती पुरविल्याप्रकरणी सांगलीच्या स्वाती पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ती पसार झाली असून तिच्या शोधासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे.  सहाय्यक पोलिस निरीक्षक शकुंतला बागलगावे, उपनिरीक्षक समीक्षा पाटील, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.