Sun, Nov 18, 2018 14:29होमपेज › Sangli › आबांच्या मृत्यूनंतर आईनेच जगण्याची ताकद दिली : रोहित पाटील (Video)

‘आबांच्या मृत्यूनंतर आईनेच जगण्याची ताकद दिली’

Published On: May 23 2018 11:28AM | Last Updated: May 23 2018 11:34AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

‘वडिलांच्या जाण्यानंतर, त्यांचे छत्र हरपल्यानंतर जी ताकद तुमच्या आईने तुम्हाला दिली त्या ताकदीचा अनुभव आज मी ही घेतोय’,असे वक्तव्य महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित याने केले. तासगावमध्ये एका कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात तो बोलत होता. 

आर.आर. आबांच्या मृत्यूनंतर आईनेच आम्हाला घडवले. जसा घडणारा असावा लागतो तसाच घडविणाराही असावा लागतो. आज या कार्यक्रमात मी कोणतेही युवा नेतृत्व म्हणून नाही तर एका आईचा मुलगा म्हणून आलो आहे,असेही रोहीत म्हणाला. झाडावरून फुले पडली तरी पुन्हा त्या झाडाला फुले येत असतात. आपल्या घराला पुन्हा फुले फुटतील असा विश्वासही रोहित यांनी बोलून दाखवला. 

राजकीय नेत्यांनी एकदा भाषण सुरू केले की ते थांबण्याचे नाव घेत नाहीत. याविषयी बोलताना, या भाषणानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वजण भाषण ऐकण्याच्या मुडमध्ये नाहीत. अनेकवेळा मी ही प्रेक्षकांच्या रांगेत बसलो आहे. त्यामुळे मी आता थांबतो, असेही तो म्हणाला. 

रोहीतच्या या छोट्याशा व्हिडिओवर आबांच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. रोहितच्या रूपात आबाच बोलत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. 

No automatic alt text available.

आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचा विवाह १ मे रोजी पार पडला आहे. आबांच्या मनातील स्मिताचा विवाह जसा असेल अगदी तसाच थाट या विवाह सोहळ्याला होता. या विवाहास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची हजेरी होती. या लग्नातही आबांच्या पत्नी आमदार सुमनताई आणि आई भावूक झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांना सावरले होते.