Thu, Apr 25, 2019 17:35होमपेज › Sangli › ताईच्या लग्नाला रोहित थिरकला..व्हिडिओ

ताईच्या लग्नाला रोहित थिरकला..व्हिडिओ

Published On: Apr 30 2018 1:14PM | Last Updated: Apr 30 2018 3:20PMसांगली : पुढारी ऑनलाईन 

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता यांचा विवाहसोहळा उद्या (१ मे) रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने त्यांच्या अंजनी येथील घरी लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू आहे. कालच त्यांना मेंहदी कार्यक्रम पार पडला. यानंतर रात्री कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष केला. यावेळी आबांचा मुलगा रोहितही कार्यकर्त्यांमध्ये येऊन गाण्यांवर थिरकला.  

या धम्माल डान्सचा व्हिडिओ रोहितने फेसबुकवर शेअर केला आहे.  ‘दिदीचा लग्न सोहळा’ अशा कॅप्शनखाली त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील यांचा विवाह  उद्योजक आनंद थोरात यांच्यासोबत ठरला आहे. हा विवाहसोहळा १ मेच्या सायंकाळी ६.४५ च्या गोरज मुहुर्तावर पुण्यात संपन्न होणार आहे. या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.    

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

Image may contain: 1 person, standing