Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Sangli › आर. आर. पाटील यांची उद्या पुण्यतिथी 

आर. आर. पाटील यांची उद्या पुण्यतिथी 

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:26PMतासगाव : प्रतिनिधी 

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अंजनी या त्यांच्या जन्मगावी शुक्रवारी ( दि. 16 ) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
स्व. आर. आर. पाटील यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी  माहिती राष्ट्रवादीचे तासगाव तालुका अध्यक्ष हणमंतराव देसाई यांनी दिली आहे. 

अंजनी येथील ‘निर्मळ स्थळ’ या आबांच्या समाधीस्थळी सकाळी आठ वाजता सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले आहे. नऊ वाजता भजन आणि दहा वाजून दहा मिनिटांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. 

यावेळी  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे - पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,  राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, राजेश टोपे, प्रतीक पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, विलासराव शिंदे, प्रकाश शेंडगे, अनिता सगरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून आदरांजली वाहणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत आर. आर. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख  (इंदुरीकर) यांचे  कीर्तन होणार असल्याचे  स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.