Tue, Jul 16, 2019 22:01होमपेज › Sangli › अंजनीत आर. आर. आबांना अभिवादन 

अंजनीत आर. आर. आबांना अभिवादन 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:33PMतासगाव : प्रतिनिधी 

माजी गृहमंत्री आर. आर.  पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अंजनी (ता. तासगाव) येथील त्यांची समाधी असलेल्या निर्मळ स्थळावर  अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून अनेकजण उपस्थित होते.

आबांच्या मातोश्री भागीरथी, पत्नी आमदार सुमनताई, कन्या स्मिता, सुप्रिया, बंधू राजाराम, सुरेश यांच्यासह कुटुंबीयांनी  समाधीचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार प्रा. शरद पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अभयकुमार साळुंखे, बापूसाहेब थोरात, गणपतराव सावंत आदिसह मान्यवरांनी समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

पंचायत समिती सभापती माया एडके, उपसभापती संभाजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, उपसभापती संपतराव सूर्यवंशी, अ‍ॅड. आर. आर. पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल पाटील,  उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार सुधाकर भोसले, गट विकास अधिकारी अरुण जाधव  यांनी समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.महांकाली उद्योग समुहाच्या अध्यक्षा अनिता सगरे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नारायणराव पवार, पंचायत समिती सभापती मनोहर पाटील, अंकुश पाटील आदिंसह कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.