Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Sangli › मनूची भलावण केल्याने पुरोगामी संतप्त

मनूची भलावण केल्याने पुरोगामी संतप्त

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 8:01PMसांगली : प्रतिनिधी

संत ज्ञानेश्‍वर माऊलीस ‘तुम्ही ब्राह्मणच नाही, तुम्ही संन्याशाची मुले’, असे  म्हणून  वाळीत टाकले, संत तुकाराम महाराज यांच्या गाथा बुडविल्या’, ते सर्व मनुस्मृतीच्या तत्वानुसार केले. आणि   शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे  यांनी ‘संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ होती’, असे विधान करून संविधान नाकारण्याचा देशद्रोह केलेला आहे.  त्यांचे खरे स्वरुप, छुपा विचार समोर आला आहे. त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांनी आता तरी शहाणे व्हावे, असे मत विविध पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. 

लोकशाहीचा अपमान : प्रवीण गायकवाड (संभाजी ब्रिगेड)

शूद्र, अतिशूद्र, स्त्रियांचे हक्क नाकारून त्यांना गुलाम बनविण्यासाठी मनुस्मृतीचा वापर केला गेला. ही मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली. डॉ. बाबासाहेब यांनी संविधानाच्या रुपाने पर्यायही दिला. पेशवाईच्या काळात मनुस्मृतीचे समर्थन केले जायचे. सध्याही पेशवाईचे राज्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पेशवाई घट्ट करण्यासाठी अशी वक्‍तव्ये केली जात आहेत. मनुस्मृतीमध्ये अंधश्रद्धा भरलेल्या आहेत. सध्या कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पुराव्यानुसार स्वीकारली जाते. परंतु अशी वक्‍तव्ये करून लोकशाहीचाच अपमान करण्याचे काम भिडे करीत आहेत. 

भिडेंनी वारकर्‍यांची जाहीर माफी मागावी : डॉ. भारत पाटणकर

मनुस्मृतीच्या विचारधारेनुसार संत ज्ञानेश्‍वर यांना वाळीत टाकले. संत तुकाराम यांचा  खून केला. संत चोखामेळा, संत नामदेव, संत एकनाथ यांचा छळ केला. एवढेच नाही तर विठ्ठलालाही नाकारण्यात आले. या ठिकाणी जावून संतांची परंपरा नाकारून संभाजी भिडे यांनी मनूचे गुणगाण गायिले. वास्तविक पाहता वारकरी परंपरेत जात-पात नाकारून सर्वजण एकत्र येतात. भेदाभेद करीत नाहीत. स्त्रियांनाही दर्जा दिला जातो. कान्होपात्रा, जनाबाई यांच्या सारख्या महिला मोठ्या संत होऊन गेल्या. या ठिकाणी मनूचे समर्थन करण्याचे भिडे यांनी धाडस करू नये. मनूस्मृतीच्या आधारेच बहुजनांच्या ज्ञानावर बंदी घालण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन मनूस्मृतीचे समर्थन करून वारकर्‍यांमध्ये हस्तक्षेप करण्याचे काम करणे म्हणजे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यामुळे भिडे यांनी तमाम वारकर्‍यांची जाहीर माफी मागावी.

भाकरीवरून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र : अ‍ॅड. के. डी. शिंदे

संभाजी भिडे हे जाणूनबुजून अशा प्रकारचे वक्‍तव्य करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुजन समाजाच्या भाकरीच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करून अनुत्पादक भाकड कथांची चर्चा ते करीत आहेत. त्यांची दखलसुद्धा घेण्याची  गरज नाही. त्यांच्यासाठी केवळ