Sun, Aug 18, 2019 21:36होमपेज › Sangli › पुढारी क्रिकेट प्रीमिअरचा शनिवारपासून थरार

पुढारी क्रिकेट प्रीमिअरचा शनिवारपासून थरार

Published On: May 24 2018 1:23AM | Last Updated: May 23 2018 7:24PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीग स्पर्धा 26 मेपासून छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर होणार आहेत. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया उत्साहात पार पडली. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याहस्ते लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन झाले.  पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील, प्रशिक्षक अनिल जोब, सचिव विज्ञान माने उपस्थित होते. 

ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘पुढारी’तर्फे सात वर्षापासून या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. दि. 26 मेपासून या स्पर्धा सुरू होणार आहे. खेळाडूंची निवड चाचणी झाली आहे. खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.  आयुक्त खेबुडकर म्हणाले, ‘पुढारी’ ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीगमुळे खेळाडूंना संधी मिळत आहे. महापालिका क्षेत्राही खेळाडूंसाठी क्रीडांगण उपलब्ध करून देणार आहे.

स्पर्धेचे संयोजन अध्यक्ष सुहास बाबर, कार्याध्यक्ष सम्राट महाडिक, उपाध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विज्ञान माने, संचालक पृथ्वीराज पवार, आदिनाथ मगदूम, रणजित सावर्डेकर, जयंत टिकेकर, सुधीर सिंहासने, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब, संदीप औताडे, राकेश उबाळे, योगेश पवार, उदय पाटील, दिनेश उबाळे, प्रशांत जाधव, हर्षद माने, धनेश कातगडे, स्पर्धेचे आधारस्तंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले आहे.

संघ व  संघमालक

शौर्य वारिअर्स, विटा (अमोल बाबर), चिंचणी चॅम्पस् (सूर्यकांतबापू माने, हर्षद माने), जय गणेश स्पोर्टस्, तासगाव (बाळासाहेब सावंत, प्रशांत पाटील), जीसीएफ वारिअर्स, तुंग (प्रमोद डांगे), इस्लामपूर टायगर्स (ऋषीकेश पन्हाळकर), गौरव नायकवडी युवाशक्ती, वाळवा (गौरव नायकवडी), मिरज मास्टर्स बॅटर्स (जयंत पोतदार, अजय मराठे, ओंकार शिखरे), डॉ. आनंदा मोरे 93, मिरज (डॉ. किरण मोरे), लायन्स ग्रुप, सांगलीवाडी (अभिजित कोळी, हरिदास पाटील), मांगले वॉरिअर्स, मांगले (इस्लाईल मुल्ला, दत्ता तडाखे), पीएनजेए स्पोर्टस्, सांगली (प्रशांत जाधव), रक्षत्रप्रेम क्रिकेट अ‍ॅकॅडमी (इम्रान पटेल), जगदंब स्पोर्टस (गणपत पवार), द जिम स्पोर्टस् (शब्बीर काठवले), ए. जे. नाईट राईडर्स.