Wed, Aug 21, 2019 03:08होमपेज › Sangli › इस्लामपूर टायगर्स, चिंचणी चॅम्पस्ची बाजी

इस्लामपूर टायगर्स, चिंचणी चॅम्पस्ची बाजी

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 8:30PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीगच्या चौथ्या दिवशी डॉ. आनंद मोरे 93 विरूद्ध इस्लामपूर टायगर्स व चिंचणी चॅम्पस् विरुध्द मांगले वारियर्स यांच्यात सामना झाला. इस्लामपूर टायगर्स व चिंचणी चॅम्पस्ने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला. संदीप यादव व सागर कोरे हे सामनावीर ठरले. सकाळ सत्रात डॉ. आनंद मोरे 93 व इस्लामपूर टायगर्स यांच्यात सामना झाला. इस्लामपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मोरे संघाने फलंदाजी करीत केवळ 50 धावा केल्या. यामध्ये निखिल वळसंग याने 19 धावा केल्या. इस्लामपूर संघाकडून शिवराम गस्ते याने 3, सचिन भोसले व संदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. इस्लामपूर संघाने 50 धावांचा पाठलाग करीत 11 षटकात हा सामना जिंकला. यामध्ये सोमेश गस्ते 20 धावा, संदीप यादव याने 19 धावा केल्या. संदीप यादव हा सामनावीर ठरला. 

दुपारच्या सत्रात चिंचणी चॅम्पस् विरूद्ध मांगले वारिअर्स यांच्यात सामना झाला. चिंचणी चॅम्पस्ने  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मांगले संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 98 धावा केल्या. यामध्ये योगेश पवार याने 42, अमित  पाटील याने नाबाद 11 धावा केल्या. चिंचणी संघाकडून  सागर कोरे 4  तर रोहित वाले याने 2 बळी घेतले. 98 धावांचा पाठलाग करताना चिंचणी संघाच्या रोहित वाले याने 24, सुमेद लोंढे याने 21 व सागर कोरे नाबाद 14 धावा केल्या. 15 षटकात हा सामना चॅम्पस्ने जिंकला. सागर कोरे हा सामनावीर ठरला. दोन्ही सामन्यांचे पंच म्हणून सतीश गोरडे, दिलीप सामंत यांनी काम पाहिले. 

सामन्यांचे संयोजन अध्यक्ष सुहास बाबर, कार्याध्यक्ष सम्राट महाडिक, उपाध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विज्ञान माने, संचालक पृथ्वीराज पवार, आदिनाथ मगदूम, रणजित सावर्डेकर, जयंत टिकेकर, सुधीर सिंहासने, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब, संदीप औताडे, राकेश उबाळे, योगेश पवार, उदय पाटील, दिनेश उबाळे, प्रशांत जाधव, हर्षद माने, स्पर्धेचे आधारस्तंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे करीत आहेत.