Thu, Apr 18, 2019 16:11होमपेज › Sangli › पुढारी प्रीमिअर लीगमध्ये जोब अ‍ॅकॅडमी अजिंक्य

पुढारी प्रीमिअर लीगमध्ये जोब अ‍ॅकॅडमी अजिंक्य

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 20 2018 7:50PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीगच्यावतीने गेले महिनाभर सुरू असलेल्या दमदार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनिल जोब क्रिकेट अ‍ॅकॅडमीने बाजी मारत या वर्षीचा विजेता संघ ठरला. मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी सांगलीत अनिल जोब अ‍ॅकॅडमी व शौर्य वॉरिअर्स विटा यांच्यात अंतिम सामना झाला. सहा धावांनी जोब अ‍ॅकॅडमीने हा सामना जिंकला. 

येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हा सामना झाला. अनिल जोब अ‍ॅकॅडमीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकात 94 धावांचे लक्ष  ठेवले. यामध्ये सूरज बनसोडेने 16, प्रशांत कोरेने 13 धावा केल्या. तसेच शौर्य वॉरिअर्सकडून संदीप मकवानाने 4, साहिल मोमीने 3 बळी घेतले. त्याला प्रतिउत्तर देताना शौर्य वॉरिअर्सचा 9 धावांनी पराभव झाला. यामध्ये अमोल भोजणेने 11, नरेंद्र कदमने 15 धावा केल्या. शौर्य वॉरिअर्सचे सूरज बनसोडेने 3, विज्ञान मानेने 2, प्रशांत कोरेने 2 बळी घेतले. सूरज बनसोडे हा सामनावीर ठरला.

उपाध्यक्ष कमलाकर पाटील व जिल्हा पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी दत्ता तडाके, सचिन माने, महावीर कुंभोजे, अमोल भोजणे आदी उपस्थित होते. गेले महिनाभर सुरू असलेल्या स्पर्धेचे संयोजन अध्यक्ष सुहास बाबर, कार्याध्यक्ष सम्राट महाटिक, आधारस्तंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख, उपाध्यक्ष कमलाकर पाटील, पृथ्वीराज पवार, सचिव विज्ञान माने, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब, दिनेश उबाळे, सुशील बुर्ले, रंजित पाटील, योगेश पवार, सुमित चव्हाण, संदीप औताडे, प्रशांत जाधव, वैभव माने, विशाल लालवाणी, सूरज कांबळे आदींनी केले