होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे सांगलीत नारीशक्तीला साद

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे सांगलीत नारीशक्तीला साद

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी

जागतिक महिलादिनानिमित्त गुरुवारी (दि. 8) रोजी दै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम व विज्ञान माने यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही मोटारसायकल रॅली दि. 8 मार्चरोजी दुपारी 4 वाजता निघणार आहे. रॅलीची सुरुवात इमॅन्युअल इंग्लिश स्कूलच्या ग्राऊंडपासून होणार आहे. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका चौक, तरुण भारत व्यायाम मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक, झुलेलाल चौक, आंबेडकर रोडहून पुष्पराज चौक येथून रॅलीचा समारोप पुढारी भवन, जिल्हा परिषदेजवळ, सांगली-मिरज रोड, सांगली येथे होणार आहे. सहभागी होणार्‍या महिलांनी नऊवारी साडी व नथ असा पोशाख परिधान करण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने केले आहे.