Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Sangli › मनस्वी पवार ‘मिसेस कस्तुरी’; श्रद्धा पाटील ‘मिस कस्तुरी’

मनस्वी पवार ‘मिसेस कस्तुरी’; श्रद्धा पाटील ‘मिस कस्तुरी’

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:36PMइस्लामपूर : वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व प्रतिराज युथ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित फूड  फेस्टीव्हलमधील फॅशन शोमध्ये मनस्वी वैभव पवार या ‘मिसेस कस्तुरी’ तर श्रद्धा अरविंद पाटील  या ‘मिस कस्तुरी’ ठरल्या. या फॅशन शो ला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

तीन दिवस चाललेल्या दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या फूड फेस्टीव्हलमध्ये हजारो लोकांनी खवय्यैगिरीचा व शॉपिंगचा आनंद लुटला. शेवटच्या दिवशी मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच फॅशन शो झाला.मिसेस कस्तुरी फॅशन शोमध्ये मनस्वी पवार या पहिल्या आणि चारुशीला नितीन फल्ले व उज्वला भोईटे या उपविजेत्या ठरल्या.  मिस कस्तुरी फॅशन शोमध्ये श्रद्धा पाटील पहिल्या तर सृष्टी पाटील, प्राची देसावळे या उपविजेत्या ठरल्या. मिस आणि मिसेस कस्तुरींना ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमधील श्रृती कुलकर्णी (रेणू) व मयुरी वाघ (अस्मिता) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह दिले.  

यावेळी प्रायोजक प्रतिराज युथ फाऊंडेशनचे संस्थापक, नगरसेवक खंडेराव जाधव, जय हनुमान पतसंस्थेचे संस्थापक, नगरसेवक  शहाजीबापू पाटील, पंचवटी इंडस्ट्रीज (रिवोचे) भरतभाई पटेल, दीपक पटेल, शाल्वी एंटरप्रायझेसचे नितीन पाटील, आयुब हवलदार, सागर जाधव, हमीद लांडगे, सदानंद पाटील आदि उपस्थित होते.

 

स्पर्धेदरम्यान हिंदी, मराठी गाणी कलाकारांनी सादर केली. डॅजलर डान्स अ‍ॅकॅडमी, कलाविश्‍व नृत्य संस्कार अ‍ॅकॅडमी, अण्णासाहेब डांगे कला अ‍ॅकॅडमी, नुपूर कथ्थक क्‍लासेस यांचाही कार्यक्रम झाला. कोरिओग्राफर हेमंतकुमार रकटे  आणि डॉ. निलम शहा यांचे सहकार्य लाभले. ब्युटी व हेअर स्टाईलसाठी प्रिया पाटील, अनिता धस, मेकअप मॅन राजकुमार   पवार यांचे सहकार्य लाभले. 

मिस आणि मिसेससाठी विजेत्या ठरलेल्यांना राजेंद्र ज्वेलर्स व न्यू प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने बक्षिसे देण्यात आली. रोहित मोरे, नीता नरके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तीन दिवस झालेल्या दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या फूड फेस्टीव्हलचा हजारो लोकांनी लाभ घेतला.