Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Sangli › पुढारी एज्यु-दिशा 2018 देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा

पुढारी एज्यु-दिशा 2018 देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 8:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्वपूर्ण वळण म्हणजे दहावी-बारावीचे वर्ष. या वर्षातच करिअरची दिशा ठरते. करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांसह पालकांची अवस्था गोंधळलेली असते. अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्यु-दिशा 2018 पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञांची व्याख्याने आणि नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार्‍या पुढारी एज्यु-दिशामुळे विद्यार्थ्यांची उज्ज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे हे आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी एज्यु-दिशा 2018 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  

सांगलीमध्ये  दि. 1 ते 3 जुलै या दरम्यान कच्छी जैन सेवा समाज भवन, सांगली-मिरज रोड  येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. करिअर निवडीबाबत घेतलेला एखादा निर्णय चुकीचा ठरू शकतो. यामुळे आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह पालकांवर येते. दहावी-बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणती शाखा निवडायची, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, शिक्षणाचे मार्ग कसे निवडावेत, शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरींगसोबत इतर कोणते शैक्षणिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वाटा कोणत्या परदेशी शिक्षणाच्या संधी कशा मिळतील, जॉब गॅरंटी असणारे शिक्षण कोणते, या व अशा विविध प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे प्रदर्शनाच्या एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रदर्शनात एकाच वेळी विविध नामवंत संस्था सहभागी होऊन त्यांच्याकडील अभ्यासक्रमांची आणि त्या अभ्यासक्रमांचे पुढचे भविष्य काय, त्यातील संधी काय आहेत याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही होणार आहेत. 

अधिक माहितीसाठी आणि स्टॉल बुकींसाठी :

सनी- 9765566413,  अविनाश : 8805007161 यांच्याशी संपर्क साधावा.