Wed, Feb 20, 2019 12:45होमपेज › Sangli › पुढारी क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेला प्रारंभ

पुढारी क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेला प्रारंभ

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:06PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीगच्या स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपधीक्षक अशोक वीरकर यांच्याहस्ते  झाले. यावेळी कार्याध्यक्ष सम्राट महाडिक, उपाध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विज्ञान माने, आदिनाथ मगदूम, अनिल जोब, जयंत पोतदार, दिनेश उबाळे उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना जयगणेश स्पोर्टस्, तासगाव विरूद्ध गौरव नायकवडी वाळवा टायगर्स यांच्यात झाला. जय गणेशने  20 निर्धारित षटकात सर्व बाद 102 धावा केल्या. वीरेंद्र पाटील यांनी 33  व प्रतीक मासाळ यांनी 18 धावा केल्या. सौरभ शिंदे यांनी 15 धावा केल्या. वाळवा टायगर्सतर्फे विशाल कुकडेने 3 बळी, अविनाश उपाध्ये, प्रवीण ढोले व वावरे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.   वाळवा टायगर्सने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून विजय संपादन केला. जय गणेशतर्फे भालचंद्र काटकर व वीरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.  विशाल कुकडे हा सामनावीर ठरला.