Fri, Jul 19, 2019 13:37होमपेज › Sangli › उद्योजकांना मूलभूत सुविधा द्याव्यात

उद्योजकांना मूलभूत सुविधा द्याव्यात

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 9:27PMसांगली : प्रतिनिधी

सांगली शहराबरोबरच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उद्योजकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, सांगली - मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे शिवाजी पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, मराठे औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष भावे यांच्यासह  समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, फायर स्टेशन, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन या गोष्टी जरूरीच्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी यासाठी प्रलंबित कामांचा निपटारा करून, उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे.बैठकीत औद्योगिक वसाहतीमध्ये बिअर शॉपीला परवानगी दिल्याबाबत, एमआयडीसी कुपवाड मधील परिवहन विभागाचे टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक तातडीने बंद करावे, मे अल्फा इंजिनिअर्स अ‍ॅन्ड फाउंन्डर्स या उद्योगातून होणारे प्रदूषण थांबवावे, एमआयडीसीमधील एलबीटी वसुली, वीज खांब, वाहिनी, रोहित्रे सुविधांसाठी ग्राहकांकडून केलेल्या खर्चाचा परतावा मिळावा, व्हॅट अंतर्गत दिलेल्या नोटिसांना स्थगिती अथवा मुदतवाढ द्यावी, एमआयडीसी क्षेत्रामध्ये दूषित पाणी पुरवठा विषयांवर चर्चा करण्यात आली.

Tags : Sangli, Sangli News, Provide, basic facilities, entrepreneurs, says Additional Collector Annasaheb Chavan