Thu, Mar 21, 2019 11:22होमपेज › Sangli › सांगलीत मोहन भागवत यांचा निषेध

सांगलीत मोहन भागवत यांचा निषेध

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:50PMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैनिकांची माफी मागावी, या मागणीसाठी युवक राष्ट्रवादीतर्फे बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर निदर्शने केली. भागवत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

युवक राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे व हरिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आशुतोष धोतरे, शुभम जाधव, विशाल हिप्परकर, साकिब  पठाण, मोहसीन सय्यद, परवेज मुलाणी, कैस शेख, संदीप कांबळे, शशिकांत शिंदे,  अमोल बनसोडे, सागर पाटील,  शुभम साळुंखे, ऋतुराज पवार, रोहित सुतार, रोहित आरगे, दीपक हरगुडे, मनोज भिसे, अभिजीत जमादार उपस्थित होते. 

जगदाळे म्हणाले, भागवत यांनी देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांच्या कार्यक्षमतेवर टीका करून भारतीयांचा अवमान केला आहे. भागवत यांनी सैनिक व देशवासियांची जाहीर माफी मागावी.