Mon, Jul 22, 2019 00:47होमपेज › Sangli › सांगलीत आयुक्तांविरुद्ध राष्ट्रवादीचे सत्याग्रह आंदोलन (video)

सांगलीत आयुक्तांविरुद्ध राष्ट्रवादीचे सत्याग्रह आंदोलन (video)

Published On: Dec 13 2017 1:03PM | Last Updated: Dec 13 2017 1:03PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या ठप्प विकासाविरोधात राष्ट्रवादीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महापालिकेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

महापालिकेच्या आयुक्तांचा निषेध करीत राष्ट्रवादीने महापालिकेच्या दारात सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आयुक्त हटाव महापालिका बचाव अशा घोषणा नगरसेवक पदाधिकारी देत आहेत. 

तब्बल 188 कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचा दावा करणार्‍या आयुक्‍तांनी त्या कामांची श्‍वेतपत्रिका काढावी. किती कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या, त्यापैकी किती कामे झाली, ही माहिती जनतेसमोर जाहीर करावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी पत्रकार बैठकीद्वारे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांना दिले होते. आठवड्यापूर्वी विकासकामे मार्गी लावण्याचा राष्ट्रवादीने अल्टिमेटम दिला होता. मात्र कामे मार्गी न लावल्याबद्दल राष्ट्रवादीने सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.