Wed, Apr 24, 2019 21:37होमपेज › Sangli › स्व. वसंतदादाचा एकेरी उल्लेख; भाजप आमदार खाडेंविरुद्ध निदर्शने 

स्व. वसंतदादाचा एकेरी उल्लेख; भाजप आमदार खाडेंविरुद्ध निदर्शने 

Published On: Jun 19 2018 1:54PM | Last Updated: Jun 19 2018 1:54PMमिरज : प्रतिनिधी 

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचा एकेरी नावाने उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने किसान चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जनता दल, शेतकरी संघटना व अन्य संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निदर्शनावेळी आमदार खाडे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो पोलिसांनी हाणून पाडत पुतळा ताब्यात घेतला. तसेच एका कार्यकर्त्यास ताब्यात घेण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर महावीर पाटील या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला सोडून देण्यात आले. अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले.